Sunday, September 15, 2013

पान ८. टपरी


प्रिय नैना,
आधी वाटले हा फेसबुक समुह म्हणजे कवितांच्या पुस्तकासारखे आहे.  आपण एक न संपणारे पुस्तक वाचतो आहोत.  पण हे पुस्तक नाही गं  हे काही औरच आहे.  कधी कधी एकटेपणा विसरायला लागणारे औषध आहे तर कधी हुरहुर लावणारे शब्दांचे खेळ.

चहाच्या टपरीवर लोकांनी
येता जाता काही बोलावे
तसेच त्या मक वर येतात
रोज कवितांचे थवे.
पीक आल्यासारख्या कविता
किती कविंच्या आणि किती
सगळेच वाचतो म्हटलेतर
वेळच न उरण्याची भीती.
हे कवितांच्या पुस्तकासारखे नाहीच
हे चहाच्या टपरी सारखेच आहे
आज वाचलेले सगळे काही
उद्या वाहून जायचे आहे.
टपरीवरच्या किती बाता
आता आठवताहेत? एकही नाही.
आजपर्यंत वाचलेल्या,
किती कविता आठवताहेत?
एकही नाही.
हो काही भास आहेत कवितांचे.
पण एक नक्की की ते लिहिणारे
कवी कवियत्री लक्षात राहतात.
कविता येतात जातात तरीही
लोक मनात राहून जातात.
मी ही असाच कुणाला तरी
लक्षात रहावे कोणत्यातरी कोपऱ्यात
ही ईच्छा सुप्तपणे
दबून बसलीय माझ्या मनात

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment