Sunday, September 15, 2013

पान २. मला मित्र आहेत


प्रिय नैना,

मला मित्र आहेत,
पण मला मित्र नाहीत.
हो मला 'खरे' मित्र नाहीत.
मी अंधाराला भीतो
हे ज्याला सांगता यावे.
मला वांग्याचा रस्सा करता येतो
हे ज्याला माहित असावे.
माझी दुःखे ज्याला दिसावीत
सांगावी लागू नयेत.
माझ्यातला सुपरमॅन पण दिसावा
फक्त दुर्गूण दिसू नयेत.
असा मित्र कुठे आहेग?
मला मित्र आहेत,
पण 'खरा' मित्र नाही गं.
याहू चॅट करून पाहिले
उगाच तासंतास वायफळ बडबड
कुणीच गंभीर नाही
कुणीच बोलत नाहीत धड
सर्वांनाच कुणी हवा त्यांचे ऐकणारा
आणायचा कुठून माझे ऐकणारा
तिथेही मित्र आहेत आता
पण मनातला अंधार त्यांना सांगता येत नाही
मला मित्र आहेत,
पण 'खरा' मित्र नाही.

तुझा, रोहित.

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment