Sunday, September 15, 2013

पान ९. ईतिहास


प्रिय नैना
जेव्हा मन खचतं ना, तेव्हा कुठूनसे काही लोक अभिप्राय देतात, धीर मिळतो.  चला कुणालातरी माझ्यातला कवी कळतो.  इतकेच पुरते सध्या जगायला.  एकटेपणाची पोकळी लपवुन हसायला. 

मी वाचलेय "व्हेन यूं थिंक
मोर एण्ड मोर पर्सनल
इट बिकम्स मोर एण्ड मोर
यूनिवर्सल" म्हणे
मग हे यूनिवर्सलच होत असणार
जे लिहिले जातेय माझ्याने
कोण्या एका काळी
एक रोहित राहायचा आणि
त्याच्या डायरीत तो लिहायचा
कविता आणि गाणी
असे वाचणारे म्हणतील
केव्हातरी नक्कीच
न्यूनगंड घेऊन बसलोय
उगाच कशाला मीच
आपला एक एक शब्द मोती आहे
मनातला अस्सल आणि प्रांजळ
हेच आहे या शब्दांचं रहस्य
हिच शक्ती हेच बळ
शंभर वर्षांनी कोणी
नैना तुला जेव्हा वाचेल
एकविसाव्या शतकात असे व्हायचे
असे म्हणत किती हासेल
माझे क्षण पकडून ठेवतोय
जपून बारकाईने
मी ईतिहास लिहितो आहे
प्रामाणिक पणाच्या शाईने

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment