Sunday, September 15, 2013

पान १. मिस्टर ईंडिया


प्रिय नैना,

त्याला अदृष्य करणारा बेल्ट मिळाला.
तो 'मिस्टर ईंडिया' झाला.
तो केव्हढा आनंदला.
मी ...
काही न मिळताच, 'मिस्टर नोबडी' आहे.
मी कुणाला दिसतच नाही;
कुणास ठऊक हे माझे पाप आहे की हा मला शाप आहे.
तो कुणाला दिसत नाही
तेव्हा तो मजा करतो.
मी सगळ्यांमध्ये असून सुद्धा
कुणाला दिसत नाही.
लाज वाटते मला;
मी आहे की नाही कुणाला फरकच पडत नाही.
बरेच काल्पनिक 'खरे' मित्र तयार केले
पण ते शेवटी 'काल्पनिकच' ठरले.
नैना, तू तरी खरी आहेस.
तू त्या काल्पनिक मित्रांपेक्षा बरी आहेस.
तू माझी डायरी आहेस.

तुझा, रोहित.

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment