Sunday, September 15, 2013

पान ११. पाठलाग


प्रिय नैना,
मराठी कविता समुहावर येऊन खूप छान वाटते आहे.  इथे कळते की काय मस्त मस्त कविता लिहितात सगळे.  कविता म्हणजे काय याचे एक छान उत्तर वाचले इंटरनेट वर, लिहिले होते 'कल्पना, भावना आणि तंत्र' यांची सुबक सांगड म्हणजे कविता.  आता कळतेय की या कवितेच्या बाबतीत आपण अगदिच तुकडीत आहोत.  या समुहावर खूप उदाहरणे मिळतात शिकायला.  तंत्रात क्रांती साडेकर, रणजीत पराडकर यांच्यासारखे प्रतिभावंत वाचायला आवडतात. कल्पनेत प्राजक्त देशमुख, श्रीधर जहागिरदार, भावनेत निरज आडे, विनायक उजळंबे असे कितीतरी छान लिहिणारे मिळालेत.  माझ्याकडे काय भावना खरी आहे पण कल्पना आणि तंत्रात आमची गाडी जरा घसरतेय हे कळायला लागलेय.  पण नैना मी पण तंत्र शिकणार, यांच्या सारख्या नाही तरी आतापेक्षा तरी अधिक सुबक काहीतरी लिहून दाखवणार हो.  पण आता जे लिहितोय ते मला का होईना खूप आनंद देतेय.  ऐक:

फेसबुकवर एका मुलीचा
पाठपुरावा करून पाहिला
पण ते काय जमत नाही
ती दादच देत नाही मला
किती फसवं जगणं आहे
ऑनलाईन म्हणतात ज्याला
जीव पण लावायचा तो एका
अनोळखी नावाला, प्रोफाईलला
थोडे दिवस धुंदी आहे
मग कळते धुके आहे
दिसते हात लावता येत नाही
भाव सुकेमुके आहे
आपण उगाच जीव लावतो
जागत बसतो तासन तास
कळतच नाही पोचतोय का
समोरच्याच्या कुठेतरी पास
रोहिणी दूर अनोळखी
तरीही ती खरी आहे
मनात ठेवून हसण्यासाठी
तीच आपली बरी आहे

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment