Sunday, September 15, 2013

पान ६. प्रोफाईल


प्रिय नैना

मला वाटायचे मी काहीतरीच लिहितो.  माझ्या लिहिण्याला कविता म्हणायचा पण मला संकोच वाटतो.  कदाचित ती कविता नसेलच.  पण जे काही लिहितो ना त्याने खूप मस्त वाटतं गं.  एकटेपणात हाच एक विरंगुळा आहे आताशा, आणि एक आशा..

फेसबुक माझ्या आयुष्याचा
अविभाज्य घटक झालाय
या फेसबुक मुळे कितीतरी
माझ्यात फरक झालाय
ईथली मुलींची प्रोफाईल पाहून
वाटते असे होईल का
यातली एखादी तरी मुलगी
आपली साथ देईल का?
किमान कुणी मुलगी
माझी छान मैत्रीण तरी...?
माझ्या स्वप्नांचा वेल निहमीच
असा जातो गगनावरी.
आधी कुणीच नव्हते ओळखीचे
आता किती तरी जण
ओळख दाखवतात
कवितांच्या समूहात तर
माझ्या कवितांना १० १० अभिप्राय येतात
त्यातल्या एका मुलीला तरी
माझ्याबद्दल कुतुहल असेल का?
माझे एकटेपण नाहीसे करण्याचे
फेसबुक हेच साधन असेल का?

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment