Sunday, September 15, 2013

पान ३. नोबडी


प्रिय नैना,
आज फेसबुक वर
एक अकाऊंट बनवला.
खरे नाव द्यावेसे नाही वाटले
नावाच्या जागी लिहिले 'नोबडी'
नाहितरी हीच माझी
ओळख ठरलीय बापडी.
वर्गातले खूप मित्र आहेत तिथे
सर्वांना मित्र यादीत जोडले
काही ओळख नसलेले पण
उगाच जोडले.
मला एक नवीन विश्व मिळालेय गं
दिवस च्या दिवस त्याच धुंदीत जाताहेत
मला कुठून कुठून कायकाय
मेसेज वर मेसेज येताहेत
मस्त वाटतंय नैना,  मी नोबडी
पण माझा फेसबुक अकाऊंट हिट
माझा झालाय सूपर नोबडी

तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment