Sunday, September 15, 2013

पान ४. गप्प बस


प्रिय नैना,
मी या ईंटरनेट च्या
प्रेमात पडलोय गं.
ते मला गप्प बस म्हणत नाही.
मला माझी गोष्ट सांगायला
कुणाचीच आता परवानगी लागत नाही.
मी माझ्या (कोणत्याही) लिखाणाला
आता कविता म्हणू शकतो
मला पण बोलायचा हक्क आहे
तो मी मिळवू शकतो.
आता माझा ब्लाग आहे,
ईटरनेट या महाजालावर
माझ्या कविता आहेत
फेसबुक च्या मराठी कविता समूहावर.
माझ्या कवितांना लोकं
मस्त छान म्हणतात
मला न ओळखणारे लोक सुद्धा
माझ्या जिवनात सध्या आनंद भरतात.
सध्या मी हसतो
धुंदीत गाणे गुणगुणतो
रात्र रात्र भर मक(१) वर
चारोळ्यांचा धागा(२) विणतो.

तुझा, रोहित

(१) मक - मराठी कविता समुह - नावाचा कवितांचा समूह
(२) चारोळ्यांचा धागा - चारोळीला कमेंट मधे उत्तर देताना खूप लोक भराभर चारोळ्या लिहितात, ते वाचून आपणही लिहायची इच्छा होते, असा वाढणारा धागा

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment