Sunday, September 15, 2013

पान १०. समुद्रचंद्र


प्रिय नैना
आज काहीतरी झालं.  मस्त झालं.  कितीतरी दिवसांनी मला गालातल्या गालात हसायला आलं.  का सांगू?

रोहिणी हे नाव
आज ऐकलं आणि
मनातच जाऊन बसलं
हे पण 'रो' पासून सुरू होतं
काय कमाल आहे
की ही कमाल नाहीच
नशिबाच्या व्यवस्थेची
धमाल आहे?
ती ओळखीची नाही
तरीही मन्त्रमुग्ध करते
तिला पाहताक्षणीच हृदय
जलद गतीने धडधडते
चंद्र दूर असूनही त्याने
समुद्राला हलवून सोडले आहे
तसेच ती किती दूर
तरीही तिने मला
पार वेडावले आहे
ईतकी सळसळ रक्तात कशी आली
कळतच नाहीये
नैना मी तुला घेऊन नाचतोय
झोप येतच नाहीये

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment