Sunday, September 15, 2013

पान ७. न्यूनगंड


प्रिय नैना,
फेसबुक समुह पण इतके वेड लावेल वाटले नव्हते मला.  फक्त वाचत राहिल्याने पण कितीतरी शिकायला मिळतेय तिथे.  फक्त त्यांच्यासारखे लिहू शकत नाही याची खंत पोखरत राहते आतून…

मराठी कविता समूहावर
कविता वाचल्या खूप
खूप आनंद झाला आणि
न्यूनगंड पण खूप
काय लिहितात गं ते
साध्या सोप्या कविता
हृदयाला स्पर्ष करणाऱ्या
रोमहर्षक पद्यगीता
निरज, विनायक, वैभव, क्रांती
काय एकसे एक प्रतिभा आहेत;
भावनांचा मोगरा कधी शेवंती
मग आपले लिखाण,
लाजवायला लागते मला.
याला कविता तरी म्हणायचे का,
जे लिहित बसतो तुला?
कदाचित मी मेल्यावर
मिळालीस तू कुणाला जर
तेव्हा तरी नोंद होईल का माझी
ईतिसाहाच्या पानांवर?
कदाचित ही ईच्छा माझ्या एकटेपणाची
परिणती आहे
या जन्मात न मिळालेली मान्यता
मिळणार मेल्यावरच शेवटी आहे

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment