Sunday, September 15, 2013

पान ५. एकटा


प्रिय नैना,

मराठी कविता समुहावर किती तरी महान कवी उत्तमोत्तम कविता लिहितात.  त्या सर्वांच्या कविता वाचून लाजल्यासारखे होते.  इतके चांगले लिहिणारे एकत्र पाहून मला अधिकच एकटे पडल्यासारखे होते.

चांगलं वागणं
छान मार्क्स मिळवणं
मला पुरत नाहीये गं
कितीही प्रयत्न केला तरी
हे एकटेपण काही जिरत नाहीये गं
वर्ग मित्र, ऑनलाईन मित्र
चॅट मित्र, कितीतरी मित्र
पण मन काही
कुठेच रमत नाहीये गं
आयुष्यात अशी आभाळपोकळी
का निर्माण होते?
कुणीतरी हवे
कुणीतरी विचारावे
का अशी घालमेल होते
कळत नाहीये गं
काय करू? मला काय होतयं
हे तरी कोण समजावेल?
उपाय सोडा पण
मला नक्की काय प्रश्न पडलेत
हे तरी कोण सांगेल?
या प्रश्नांच्या गराड्यात
मी भांबावलोय गं
मी खरचं एकटा पडलोय गं

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment