प्रिय नैना,
कविता ही एक नशा आहे गं. समुहावर पण पाहतो ना लोक वेडे आहेत कवितेच्या पायी. कविता लिहितातच कवितांवर अभिप्राय सुचना पण लिहितात. त्यामुळे खूप शिकायला मिळते. कवितेचे किती प्रकार आहेत हे अनेक कवितांकडे पाहून शिकायला मिळतेय मला. खूप लोक गझल लिहितात तिथे, ती मात्र फार कळत नाही. कळेल हळू हळू, आता कुठे माझी तुकडी सुरू आहे ना. एक गम्मत सांगू?
ही माझी खोली
ही माझी रियासत आहे
मी इथला राजा
तिच्या आठवणी माझी दौलत आहे
पण या राजाला
पोट भरायला दुनियेत शिरावे लागते
रियासतेतून बाहेर पडून
झिजावे लागते
तिथे मी शून्य आहे
एक दुर्लक्षित नोबडी
म्हणून मला ईथे
रियासतेतच राहायची गोडी
ही रात्र, या कविता
आणि तिच्या आठवणी
रोज वाटते आयुष्य थांबावे
या ईथे याच क्षणी
त्या आठवणींना आता एक चेहरा आहे
एक नाव मिळालेय 'रोहिणी'
कुणाला ईतकं आठवणं
हा गुन्हा असतो का गं?
माझ्या समोर सतत
तिचाच चेहरा का यावा गं?
- तुझा, रोहित
(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५
No comments:
Post a Comment